Wednesday , March 4 2026
Breaking News

बेंगलोर येथे राज्यस्तरीय कार्यक्रमात विजय मोरे यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : राजधानी बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एका विशेष राज्यस्तरीय समारंभात सार्वजनिक सेवा आणि समाजाला मदत करण्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल बेळगावचे माजी महापौर आणि आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

समुदाय साहित्य मत्तू संस्कृती प्रतिष्ठान, बेंगलोर आणि श्री सिद्धगंगा मठ, तुमकुरू यांनी या विशेष समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभात सामाजिक क्षेत्र, संस्कृती क्षेत्र, शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये भरीव उल्लेखनीय कार्य करत असलेल्या कर्नाटकातील उत्कृष्ट व्यक्तींना गौरवण्यात आले. सामाजिक विकासासाठीचे समर्पण, मजबूत नेतृत्व आणि गरीब, वृद्ध व मनोरुग्ण लोकांना मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याबद्दल यावेळी विजय मोरे यांचे मुक्तकंठाने कौतुक करण्यात आले. मोरे यांच्यासारख्या प्रेरणादायी लोकांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी अनेक आदरणीय पाहुणे, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि नेतेमंडळी उपस्थित होती. सदर समारंभ मध्ये मान्यवरांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कारांचे वितरण यांचा समावेश होता.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *