Wednesday , March 4 2026
Breaking News

आषाढी एकादशीनिमित्त नेताजी हायस्कूल सुळगे (ये) शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

Spread the love

 

येळ्ळूर : सुळगे (ये) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ शाळेचे मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण आणि सर्व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते करण्यात आला. विठ्ठल रखुमाई तसेच तुकाराम महाराज, सोपानदेव, ज्ञानदेव, चोखामेळा मुक्ताई, जनाई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. प्रारंभी शाळेच्या पटांगणातून सुळगे(ये) गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर, भावकेश्वरी मंदिर आणि मारुती मंदिर पर्यंत पायी दिंडी काढून सर्वांचे लक्ष या दिंडीकडे वेधण्यात आले.
सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक वर्ग यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई यांची यथा सांग पूजा करून विठ्ठल रखुमाई वारीच्या दिंडीचे महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगून या पायी दिंडी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *