
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमा निमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेच्या माधव सभागृहात आयोजित समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास जी आय, जनकल्याण ट्रस्टचे सचिव सुधीर गाडगीळ, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती ओमकार भारत माता फोटोपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी रूपा कुमठाकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, कार्यक्रमाला प्रारंभी गुरुस्तोत्र पठण करून करण्यात आले. शालेय विद्यार्थी दिव्या दाबीमठ व गौसीया माडीवाले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचे महत्व व आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सान्वी पाटील, विद्या पिठोळे, सृष्टी वाघ, अलिना पठाण, अमित मिरजकर, बलराम सुळगेकर, दिग्विजय बैलूर, साईकिरण शिंदे, सर्वेश एम, सिया पेडणेकर, मृणाल शिन्नोळकर, अमृता करेगार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता नववी आठवीच्या अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा व शाळेच्या शिक्षिका प्रेमा मेलनमनी, प्रीती कोलकार, शिपाई सुनिता पाटील, सुजाता होळकर, बसवंत पाटील यांचा ही सत्कार करण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले याप्रसंगी अनंतराम कलुरय्या, रंजनी गुर्जर, नीलिमा गाडगीळ, शालेय शिक्षक व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पाटणकर. तर रूपा कुमठाकर यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta