
बेळगाव : गणेशपुर येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक गटात संत मीरा अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद खानापूर आणि हनिवेल खानापूर, देवेंद्र जीनगौडा शिंदोळी या शाळेनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्यफेरीत प्रवेश केला.
सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे संत मीरा गणेशपुर शाळेचे सदस्य महेश नरगुंदकर, संतमीरा गणेशपुर शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, स्पर्धा सचिव आशा भुजबळ, श्वेता पाटील, श्रीकांत कांबळे या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व नाणेफेंक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवकुमार सुतार, यश पाटील, सागर कोलेकर, गंगा, रजत साळुंखे, स्वाती सावंत, मंजुनाथ अभिषेक गिरीगौडर, सिद्धांत वर्मा, व विविध शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta