
बेळगाव : श्रीराम कॉलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भजनाचा कार्यक्रम पार पडला. दि. ०९/०७/२०२५ रोजी गंगा नारायण सभागृहात झालेल्या कार्यक्रमास योगगुरू डॉ. पटृनशेटी व महिला अध्यक्ष सौ. वर्षा घाडी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. हंदीगनूर गावातील भजनी मंडळाच्या पंचवीस भगिनींनी भजनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या सादर केला. या कार्यक्रमासाठी बांधकाम व्यावसायिक श्री. अनंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते २०२४-२५ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले अशा विद्यार्थ्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास श्री. सोम शेखर मुस्तिगिरी आणि परिवार यांनी महाप्रसादाचे आयोजन करून वितरणाची जबाबदारी स्वीकारली. त्याबद्दल सौ व श्री मुस्तिगिरी कुटुंबाचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ व श्री अनंत पाटील यांनी भजनी मंडळांचा खर्च उचलला त्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. श्री. अनंत पाटील यांच्या हस्ते भजनी मंडळांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या वर्षभर चालणाऱ्या कार्यास मोठा आर्थिक हातभार लावाला. त्याबद्दल मिरजकर व भस्मे परिवाराचा आणि सौ व श्री परशुराम सुळेभावी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष बाबूराव घोरपडे यांनी केले तर सुत्रसंचालन श्री. जयवंत खन्नुकर यांनी केले.
या प्रसंगी मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेक्रेटरी सुधीर सांबरेकर, खजिनदार राजाराम गुरव, माजी अध्यक्ष विलास घाडी, प्रदीप जोशी, प्रदीप चव्हाण, परशुराम सुळेभावी, उमेश वाळवेकर, मदन भस्मे, प्रकाश घाडी, अनिल पावसकर, अभिषेक साबरेकर, उमाकांत कामुले, रणजित पवार, अर्चना भस्मे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी श्री. कंग्राळकर यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Belgaum Varta Belgaum Varta