
बेळगाव : भाग्यनगर सहावा क्रॉस परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. मागील चार महिन्यांपासून या रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. भाग्यनगर सहावा क्रॉस परिसरात अनेक शाळा देखील आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग नेहमी येजा करत असतो. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत. बऱ्याचदा वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधीकडे या रस्त्यासंदर्भात समस्या मांडली होती. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या भागातील नागरिकात नाराजी पसरली आहे. पावसामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले पडले आहेत खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हे समजणे कठीण होऊन बसले आहे. या रस्त्यावरून येताना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन ये-जा करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी चार महिन्यांपूर्वी रस्ता दुरुस्तीबाबत महानगरपालिका प्रशासनाशी पाठपुरावा केला असून देखील अद्याप महानगरपालिकेने या रस्त्याची दखल घेतलेली नाही. या रस्त्याची तात्काळ डागडूची झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta