
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
——————————————————————-
बेळगाव : आज युवा समिती सिमाभागच्या वतीने बेळगावचे महापौर मंगेश पवार यांची कन्नड सक्ती थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत यासाठी भेट घेण्यात आली.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी माहीती देताना सांगितले की, मागिल आठवड्यात कन्नड प्राधिकरणाची बैठक पार पडली आणि या बैठकीत मराठीसह इतर भाषेतील फलक तसेच शासकीय कामकाजात कन्नड सक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला, पण बेळगावसह ८६५ खेडी ही मराठी बहुभाषिक असून या मराठी बहुभाषिक भागात कन्नड भाषा सक्तीची करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या हक्कावर गद्दा आणणे आहे. तसेच २००४ पासून महाराष्ट्र-कर्नाटक सिमाविवाद सर्वोच्च न्यायालयात असून तेथील निर्णयाचा आम्ही सर्वजनच सन्मान करणार आहोत, बेळगाव सह सीमाभागात मराठी भाषिक बहुसंख्य असल्याने बेळगाव महानगर पालिकेचे महापौर म्हणून आपण हा निर्णय त्वरित मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे उपसचिव बेळगावात आले होते त्यावेळी आम्ही त्यांना या विषयावर निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी महानगर पालिकेसह जिल्हाधिकारी यांना सुचना केली होती, त्यांच्या सुचनेचा अवमान केला जात असून कन्नड सक्तीच्या माध्यमातून मराठी भाषेला डावल्यास मराठी भाषिक म्हणून रस्तावर उतरून आंदोलन केल्या शिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे आपण कन्नड सक्ती त्वरित मागे घ्यावी अशी आपणास विनंती निवेदनाद्वारे केली.

युवा समिती सीमाभागच्या बैठकीत ठरलेल्या उपक्रमा प्रमाणे बेळगावच्या महापौरांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले, तर इतर लोकप्रतिनिधींची भेट येत्या काळात त्यामध्ये बेळगावचे पालकमंत्री, खासदार, कारवारचे खासदार, चिक्कोडीचे खासदार, खानापूर, बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, चिकोडी,
निपाणीचे लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन कन्नडसक्ती संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, यानंतर प्रशासनाला कोणतीही जाग न आल्यास प्रत्येक मतदार संघातील मराठी भाषिकांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेण्यात येणार आहे व येत्या काळात मराठीसाठी जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर, महेश टकसाळी, राजकुमार बोकडे, माजी महापौर महेश नाईक, माजी नगरसेवक दिलीप बैलकर, शिवाजी हावळाण्णाचे, महादेव पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक घगवे, बेळगाव युवा सेनेचे विनायक हुलजी, विद्येश बडसकर, सक्षम कंग्राळकर, प्रकाश हेब्बाजी, रमेश माळवी, सागर कणबरकर, महेंद्र जाधव, जोतिबा येळ्ळूरकर, सुधीर शिरोळे, बाबू पावशे, मोतेश बार्देशकर, विजय सांबरेकर, राजू पाटील, सुरज जाधव, सुरज पेडणेकर, अकाश कडेमनी, अशोक सुभेदार, विनायक पवार, राजू पाटील, विनायक मजुकर, श्रीकांत नांदुरकर, अनिल देसूरकर, राजू पावले यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta