
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————-
——————————————————————-
बेळगाव : लव्ह डेल सेंट्रल हायस्कूल आयोजित श्रीनगर येथील लव्ह डेल शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या लव्ह डेल चषक आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी ठेवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात महंमद गौस याने नोंदवलेल्या एकमेव विजयी गोलावर सेंट झेवियर्स संघाने यजमान लव्ह डेल हायस्कूल संघावर चुरशीच्या लढतीत १-० असा निसटता विजय संपादन करत चषक निर्विवादपणे पटकाविला. या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा पुरस्कार हुसेन जमादार तर उदयोमुख फुटबॉलपटूचा पुरस्कार वरूण पुजारी यांना आकर्षक चषक देऊन गौरव करण्यात आला. सकाळच्या सत्रात खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात लव्ह डेल हायस्कूल संघाने के. एल. ई. इंटरनॅशनल हायस्कूल संघावर सडन डेथवर २-१ असा विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्णायक सामन्यात लव्ह डेल हायस्कूल संघाने पहिला गोल करून १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात के.एल.ई. हायस्कूलने बरोबरीचा गोल नोंदविला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने मराठी विद्यानिकेतन स्कूल संघावर ३-० असा सहज विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सेंट झेवियर्स हायस्कूल तर्फे वरूण पुजारी, आरखान बडेधर, महंमद गौस भैरकदार यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. अंतिम सामनाला प्रारंभ होण्यापूर्वी लव्ह डेल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी इंचल यांच्या हस्ते दोन्ही संघातील फुटबॉलपटूंचा परिचय करून देण्यात आला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत. उपस्थित फुटबॉल प्रेमींचे लक्ष वेधून घेतले. पूर्वार्धात उभेय संघांना एकही गोल करताना नाही. उत्तरार्धात खेळाच्या १२ व्या मिनिटाला सेंट झेवियर हायस्कूलचा आघाडी फळीतील फुटबॉलपटू महम्मद गौस भैरकदार याने वरूण पुजारीच्या पासवर हेडर द्वारे गोल करून संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सागर फार्मसी विद्यालयाचे प्राचार्य किरण कुमार व्हनटी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट, मानस नायक यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. प्रमुख पंच म्हणून फिरोज शेख, राॅयस्टन जेम्स, कृष्णा मुचंडी व पवन यांनी काम पाहिले.

Belgaum Varta Belgaum Varta