
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या सांगण्यावरून महानगरपालिकेत कन्नडविरोधी किंवा कन्नडचा अपमान केल्यास कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते पालिकेला घेराव घालून त्यांना धडा शिकवतील, असा कर्नाटक रक्षण वेदिके (नारायणगौडा गट)ने इशारा दिला आहे.
गुरुवारी, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायणगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांची भेट घेतली. बेळगाव शहरात सरकारच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रांमध्ये कन्नडची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे आणि हे कार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत म. ए. समितीच्या अरेरावीला घाबरून न जाता, बेळगाव पालिकेत कन्नडची सक्ती कायम ठेवावी, असे ककर्नाटक रक्षण वेेेदिकेचे राज्य संयोजक राजू नाशीपुडी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “महाराष्ट्र एकीकरण समिती सीमााभागच्यावतीने महापौर, उपमहापौर यांची भेट घेऊन कन्नडसक्ती विरोधात निवेेेदन दिले होते. म. ए. समितीच्या या अरेरावीला घाबरून न जाता कन्नडची सक्ती करावी.”
यावेळी सुरेश गवण्णवर, गणेश रोकडे, मंजुनाथ राठोड, रमेश यरगण्णवर, विनायक भोवी, लोकेश राठोड यांच्यासह कर्नाटक रक्षण वेदिकेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta