
बेळगाव : शिक्षण महर्षी कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांचा पुण्यस्मरण दिवस हा शैक्षणिक उपक्रम दिन म्हणून गेली एकोणीस वर्षे साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून, मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. सौ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील आंतरशालेय वकृत्व स्पर्धा येथील मराठा मंडळाच्या भातकांडे सभागृहात संपन्न झाल्या. विद्यार्थांच्या वक्तृत्व कलेला निर्विवादपणे वाव देणारी स्पर्धा नेहमीप्रमाणे या वर्षीही चुरशीची ठरली. बेळगाव जिल्हा व परिसरातील नामांकित शाळांचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मराठी माध्यमाचे एकोणपन्नास स्पर्धक तर इंग्रजी माध्यमाच्या बावीस स्पर्धकांनी आपली वक्तृत्व कला सादर केली.
पाठांतर, हावभाव, विषय मांडणी, आवाजाची चढउतार व एकूण परिणाम हे निकष घेऊन स्पर्धकांची चाचपणी करणारी ही स्पर्धा खूपच चुरशीची झाल्याचे संकेत स्पष्टपणे दिसत होते.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डाॅक्टर. ए. एल. पाटील, प्राचार्य एस. एस. ई. टी चंद्रगीरी महिला बी एड काॅलेज, बेळगाव, प्रा नितीन देसाई खानापूर, निवृत्त शिक्षिका श्रीमती विद्या देशपांडे व प्रयोगशील शिक्षक श्री. गोविंद पाटील खानापूर यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाला मराठा मंडळ ट्रस्टबोर्डचे सदस्य श्री. रामचंद्रराव मोदगेकर तसेच मं. मं. ताराराणी कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील, म. मं. पदवीपूर्व काॅलेजच्या प्राचार्या श्रीमती कविता पाटील, जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील , म. मं हायस्कूलचे उपप्राचार्य एम. के. पाटील, सेंट्रल हायस्कूलचे श्री. पी. बी. मास्तीहोळी हे उपस्थित होते.

प्राचार्य. श्री. अरविंद पाटील यांनी परीक्षक व पाहुण्यांची ओळख करून दिली.
उपस्थित पाहुणे व परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित परीक्षकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच शिक्षण महर्षी कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ट्रस्टबोर्ड सदस्य श्री. रामचंद्र मोदगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. परीक्षक डाॅक्टर ए. एल. पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धेचे वाढते महत्त्व विषद केले.
म. मं. जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीनी स्पर्धा पूरक सुरेल स्वागत गीत गाऊन स्पर्धेची रंगत वाढवली.
मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी कै श्री. नाथाजीराव हलगेकर (साहेब) यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात या स्पर्धेचा उत्कंठा वर्धक निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
शेवटी कार्यक्रमाचे आभार श्वेता जाधव यांनी मांडले. या कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन श्री. एम. एस. संभाजीचे यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका श्रीमती अंजली चव्हाण यांच्यासह श्वेता जाधव, कविता फडके, कृष्णा पानेरी, रेश्मा राक्षे, रसूल घोरी, मराठा मंडळ चव्हाट गल्ली येथील तीन शाळांचे व ज्यूनिअर कॉलेजचे शिक्षक तसेच संस्थेतील विविध शाळांच्या क्रीडा शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta