Wednesday , March 4 2026
Breaking News

बी. के. मॉडेलला राज्यातील सर्वोत्कृष्ट एनसीसी शाळा पुरस्कार

Spread the love


बेळगाव : कर्नाटक -गोवा एनसीसी संचालनालयातर्फे शहरातील कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलला 2021 सालातील कनिष्ठ विभागातील राज्यातील सर्वोत्कृष्ट एनसीसी शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

बेंगलोर येथे काल रविवारी झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये कर्नाटक -गोवा एनसीसी संचालनालयाचे प्रमुख एअर कमोडोर भूपेंद्रसिंग कंवर यांच्या हस्ते बेळगावच्या बी. के. मॉडेल हायस्कूलला प्रशस्तीपत्रासह आकर्षक फिरत्या करंडकाच्या स्वरूपात राज्यातील सर्वोत्कृष्ट एनसीसी शाळेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेळगावचे एनसीसी ग्रुप कमांडर कर्नल के. श्रीनिवास 25 कर्नाटका एनसीसी बटालियनचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नंदकुमार, बी. के. मॉडेल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शैला चाटे आणि एनसीसी अधिकारी सेकंड ऑफिसर रवी घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बी. के. मॉडेल हायस्कूलला उपरोक्त यश मिळण्यासाठी 25 कर्नाटका बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव सहानी, बेळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, सचिव शिवणगीसर, संयुक्त सचिव अरविंद हुनगुंद आदी मान्यवरांसह शाळेचा शिक्षक वर्ग आणि 25 कर्नाटका बटालियनच्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *