
बेळगाव : मोहरम मिरवणुकीवेळी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
बेळगाव शहरातील कसई गल्लीत सदर घटना घडली. या जखमी मुलाचे नांव रेहान अस्लम मुजावर (वय 16, रा. न्यू गांधीनगर, बेळगाव) असे आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
तलवार हल्ल्यात रेहान याच्या डाव्या खांद्याच्या मागे आणि डोक्याला तलवारीचे वार बसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला बिम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटना उघडकीस येताच, पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे आणि डीसीपी नारायण बारामणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण होते आणि पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Belgaum Varta Belgaum Varta