
बेळगाव : बेळगावमध्ये एका युवकाने दारूच्या नशेत नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे. ही घटना बेळगाव तालुक्यातील कंग्राळीजवळ मार्कंडेय नदीत घडली असून, स्थानिक पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
कंग्राळी गावातील सचिन माने या युवकाने दारूच्या नशेत मार्कंडेय नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी दारूची बाटली, पाण्याची बाटली आणि शेंगदाणे आढळून आल्याने तो पूर्णपणे नशेत असल्याची शक्यता बळावली आहे. नदीत उडी मारण्यापूर्वी त्याने एका व्यक्तीशी फोनवर संभाषण केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने एका स्थानिक तरुणाच्या मोबाईलवर फोन करून त्यानंतर नदीत उडी मारली.
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन माने नदीत पडताच दोन तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी तात्काळ धाव घेतली आणि प्लास्टिकची वस्तू फेकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या युवकाने ती वस्तू पकडली नाही आणि तो नदीच्या प्रवाहात वाहत गेला. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. माहिती मिळताच एपीएमसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पाहणी करून शोधकार्य सुरू केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta