Wednesday , March 4 2026
Breaking News

राजलक्ष्मी चिल्ड्रेन फाउंडेशनचा महत्वाचा टप्पा; १०००वा विद्यार्थी दाखल, ६७ विद्यार्थ्यांना टॅब व शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

 

बेळगाव : चिक्कोडी शिक्षण विभागातील ६७ होतकरू आणि वंचित पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना राजलक्ष्मी चिल्ड्रन फाउंडेशन (RCF) या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने टॅब आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आयोध्यानगर, कोल्हापूर सर्कलजवळील फाउंडेशनच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. याच वेळी, फाउंडेशनच्या प्रमुख ‘प्रतिभा पोषक’ उपक्रमांतर्गत १०००व्या विद्यार्थ्याची नोंदणी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, लेकव्ह्यू हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश सोनवळकर यांनी डॉ. शशिकांत आणि डॉ. विजयलक्ष्मी कुलगोड यांच्या कार्याचे कौतुक केले. “पैसे असले तरी वेळ आणि मोठं मन प्रत्येकाकडे नसतं. कुलगोड दाम्पत्य हे वैद्यकीय व्यवसायात असूनही समाजसेवा करत आहेत, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे,” असे डॉ. सोनवळकर म्हणाले. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, सोशल मीडियाच्या आहारी न जाता, या टॅब्सचा उपयोग आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी करावा.

चिक्कोडी शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी असीफ बिरादार यांनीही फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. “जेव्हा बहुतांश लोक स्वतःसाठी संपत्ती निर्माण करतात, तेव्हा ही संस्था देशासाठी मानवसंपत्ती निर्माण करत आहे,” असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी बोलताना डॉ. रवींद्र गुरवण्णावर यांनी सांगितले की, २०२१ साली कोविड काळात सुरू झालेला ‘प्रतिभा पोषक’ उपक्रम ग्रामीण व निमशहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांना डिजिटल साधने, मेंटरशिप, शिष्यवृत्ती आणि भावनिक आधार देतो. “यंदाच्या चौथ्या टप्प्यात, उत्तर कर्नाटकमधून ३६० नवीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यात चिक्कोडीमधील ६७ आणि बेळगावातील ६८ विद्यार्थी सहभागी आहेत,” अशी माहिती डॉ. शशिकांत कुलगोड यांनी दिली.

कार्यक्रमाला डॉ. विजयलक्ष्मी कुलगोड, डॉ. सरसिजा सुरेश, डॉ. कीर्ती शिवकुमार आणि एम.एन. सिंदूर हे फाउंडेशनचे संचालकही उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *