
बेळगाव : बेळगावच्या उद्यमबाग पोलिसांनी मोठी कारवाई करत २३.८४० किलो गांजा जप्त केला असून तिघांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
उद्यमबाग पोलिस स्टेशनचे पीआय डी.के. पाटील यांनी मोठी कारवाई करत शहरात गांजा विकणाऱ्या तीन जणांना अटक केली. अटक केलेल्यांकडून १० लाख रुपये किमतीचा २३.८४० किलो गांजा जप्त करण्यात आला.
औद्योगिक क्षेत्रातील एपीके कारखान्याजवळ छापा टाकण्यात आला आणि दिलीप दोडमणी, नखिल सोमाजीचे आणि वीरेश हिरेमठ यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २३.८४० किलो गांजा, एक हुंडई व्हेरेना कार आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta