
बेळगाव : शहापूर, बेळगाव येथील कै. नारायणराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानने आबा स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने मुला- मुलींसाठी आयोजित जलतरण स्पर्धा काल रविवारी उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली.
गोवावेस येथील महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये शहर परिसरातील सुमारे 200 जलतरणपटूंनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या समायोचित उद्घाटनपर भाषणात महापौर पवार यांनी अशा स्पर्धांमधूनच राज्य व देशपातळीवरील क्रीडापटू निर्माण होत असतात असे सांगून दोन्ही संस्थांचे प्रमुख माजी नगरसेवक नेताजी जाधव, श्रीधर (बापू) जाधव, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि आबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष विश्वासराव पवार यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, बाळासाहेब काकतकर, नगरसेवक नितीन जाधव, विश्वासराव पवार, नेताजी जाधव, ॲड. महेश बिर्जे, मालोजीराव अष्टेकर, गोपाळराव बिर्जे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे नेताजी जाधव, मालोजी अष्टेकर, श्रीधर (बापू) जाधव आदींनी केले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी म. ए. समितीचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे, ॲड. सुधीर चव्हाण, डॉ. समीर पोटे, युवा समितीचे अंकुश केसरकर, श्रीकांत कदम वगैरेंच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास राजाराम सूर्यवंशी, मनोहर होसुरकर, प्रदीप शिट्टीबाचे, शंकर केसरकर, तानाजी शिंदे, विठ्ठल कडगावकर, यशवंत देसाई, शाहू शिंदे, यल्लप्पा नागोजीचे, महेश दड्डीकर, बाबू कोले, बंडू बामणे, दिनेश मेलगे, शाहू शिंदे, अनिल आंबरोळे, शंकर केसरकर, सतीश शिंदे, पायल राहुल कदम यांच्यासह बहुसंख्य क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta