Wednesday , March 4 2026
Breaking News

भवानीनगर येथे बांधकाम व्यावसायिकाची हत्या

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : शहरातील भवानीनगर उपनगराच्या जवळ एका व्यावसायिकाची हत्या झाल्याचा प्रकार मंगळवारी भल्या पहाटे घडला आहे. चाकूने वार करून त्याला ठार करण्यात आले आहे. त्याआधी त्याच्या डोळ्यात आणि तोंडामध्ये तिखट पूड टाकून त्याला भोसकण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे टिळकवाडी, भवानीनगर, मंडोळी रोड परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपलब्ध माहितीनुसार, मूळचा हलगा येथील रहिवासी असणारा हा राजू नामक बांधकाम व्यावसायिक सध्या संस्कृती पाम्स टिळकवाडी येथे राहत होता. जागेसंदर्भात काही वादामधून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पहाटेच्या सुमारास एक फोन कॉल करून त्याला बोलावून घेण्यात आले. त्यानंतर तो आपली स्कोडा कार घेऊन घराबाहेर पडला होता. मात्र तासाभरातच त्याची हत्या झाली असल्याचे वृत्त सामोरे आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *