Wednesday , December 10 2025
Breaking News

शहापूर भागातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी प्रमाणे शहापूर भागातील मराठी सरकारी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ८ होसुर, शाळा क्रमांक ४५ नार्वेकर गल्ली, शाळा क्रमांक १५ खासबाग, शाळा क्रमांक १३, २६ आणि १६ बसवणगल्ली, शाळा क्रमांक १९ आणि आदर्श मराठी विद्यामंदिर अळवणगल्ली शहापूर मधील पहिली आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांशी संवाद साधला आणि भविष्यातील शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असून सदर शाळा या शहापूर भागातील गौरव असून त्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणे गरजेचे आहे अशी आशा व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, माजी नगरसेवक राजू बिर्जे, सुरज कुडुचकर, प्रशांत भातकांडे, किरण हुद्दार, सुरज चव्हाण, आकाश भेकणे, विकास भेकणे, प्रविण शहापूरक, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *