
बेळगाव : गणेशपुर रोड येथील गुडशेफर्ड शाळेच्या आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय आंतरशालेय मुला मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा बेळगांव, आरव्हीके, बंगळूर , विवेकानंद पदवीपूर्व कॉलेज मंगळूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
14 वर्षाखालील मुलांच्या अंतिम लढतील संत मीरा बेळगाव संघाने आरव्हीके स्कूल बंगळूरचा 3-0 असा पराभव केला. मुलींच्या गटातील अंतिम लढतीतही संत मीरा बेळगावने आरव्हीके स्कूल बंगळूरचा 3-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या कर्णधार निधीशा दळवीने दोन गोल, समीक्षा खन्नुरकरने 1 गोल केला. माध्यमिक मुलांच्या गटात आरव्हीके बंगळूरने संत मीरा बेळगांवचा 1-0 असा निसटता विजय संपादन केला. तर मुलींच्या गटात संत मीरा बेळगावने आरव्हीके स्कूल मंगळूरचा 2-0 असा पराभव केला विजयी संघाच्या दीपिका व दीपा बिडीने प्रत्येकी 1 गोल केला. 19 वर्षाखालील मुलांच्या गटात विवेकानंद कॉलेज मंगळूरने शांतिनिकेतन पदवीपूर्व कॉलेज खानापूरचा 1-0 असा पराभव केला. वरील विजेते संग सप्टेंबर महिन्यात कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत दक्षिण मध्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे सार्वजनिक शिक्षण खात्याचे जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, बेळगांवचे माजी शरीरसौष्ठपट्टू प्रणय शेट्टी, प्रशिक्षक रवी मालशेट, मलगौडा, अनिल पत्तार, व्ही सी अडकी विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, यश पाटील, अमृता पेटकर, पोर्णिमा या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र, पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पंच मानस नायक, आदित्य सानी, स्वरूप हलगेकर, प्रणव देसाई, चैत्रा इमोजी, बसवंत पाटील, लक्ष्मी पेडणेकर, रेखा मलतवाडी, सोहेल विजापुरे, समर्थ पनारी, अनिरुद्ध हलगेकर, संचित धामणेकर, मनस्वी चतुर, ऋतिका हलगेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता पेटकर तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta