
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या सभेत आज मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद झाला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी महापालिकेची परिपत्रके मराठीत द्यावीत, अशी जोरदार मागणी केली. या मागणीवरून सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी महाराष्ट्र भाजपचे नेते संग्राम कुपेकर यांनी ठाम भूमिका घेत, स्पष्ट शब्दांत विचारले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भाषांना समान अधिकार दिले आहेत. मग बेळगावात मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेतील परिपत्रके का नाकारली जात आहेत?.. काही मोजक्या कन्नड समर्थकांनी मराठी भाषेला विरोध दर्शवत संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी चुकीची आहे असून मराठी भाषिक नागरिकांच्या अधिकारांसाठी मी कायम त्यांच्या सोबत उभा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Belgaum Varta Belgaum Varta