
बेळगाव : कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नड सक्तीचा फतवा निघाला त्या फतव्याला विरोध करण्यासाठी युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकमध्ये कन्नड सक्ती थांबविण्यासाठी तसेच सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा यासाठी लोक प्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने उद्या रविवार दिनांक 27 रोजी बेळगाव ग्रामीणच्या आमदार मा. लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेण्यासाठी सकाळी ठीक 9.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथून त्यांच्या निवासस्थानी जायचं आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे यांना संपर्क करावा असे आवाहन युवा समिती सीमाभागच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क-9945346640

Belgaum Varta Belgaum Varta