बेळगाव : नुकत्याच बेंगलोर येथील केन्सिंगटन हलसूर डॉल्फिन जलतरण तलावात कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित सब ज्युनिअर ज्युनिअर व सीनियर डायव्हिंग स्पर्धेत आबाहिंद क्लबच्या डायव्हिंग पटूनी उत्कृष्ट कामगिरी करून कर्नाटक राज्य संघात स्थान मिळवले. यामध्ये कुमार अर्णव कुलकर्णी ग्रुप 1 एक मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग एक रौप्य पदक, कुमार युवराज मोहनगेकर ग्रुप 2, एक मीटर व तीन मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग एक सुवर्ण एक रौप्य पदक, कुमारी तन्वी कारेकर ग्रुप 3, तीन मीटर व एक मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये एक सुवर्ण एक रौप्य पदक व वैयक्तिक चॅम्पियनशिप, कुमारी श्रेया जोगमनावर ग्रुप 3 मध्ये एक मीटर व तीन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये एक सुवर्ण एक रौप्य पदक संपादन केले. दिनांक 4 ते 8 ऑगस्ट रोजी बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी वरील चौघांची अभिनंदनीय निवड झाली आहे. तसेच कर्नाटक राज्याचे ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार यांची कर्नाटक राज्य संघात डायव्हिंग टीमचे मॅनेजर म्हणून निवड करण्यात आली आहे.
या सर्व डायव्हिंगपटूना आबा हिंद क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार, श्री शिवराज मोहिते, भरत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे अध्यक्ष शितल हुलभक्ते, अरविंद संगोळी, भरत गडकरी व शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभते.

Belgaum Varta Belgaum Varta