बेळगाव : कंग्राळी खुर्द या गावचे ग्रामी पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने लोंबकणाऱ्या तारा व जुने खांब बदलून नवीन खांब बसवावे अश्या आशयाचे निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
या गावात बऱ्याच ठिकाणाचे विद्युत खांब जुणे असलेने ते जीर्ण होऊन खराब झाले आहेत. तसेच गावात व शिवारांत अनेक ठिकाणी लोंबकणाऱ्या तारा असलेने धोकादायक स्थिती आहे. तरी वस्तूस्थितीची पाहणी करून गवातील जुने खांब बदला तसेच आता शक्य असणाऱ्या धोकादायक लोंबकळणाऱ्या आता बदला व शिवारातील झुकलेले खांब पाऊस कमी झाल्यानंतर बदलण्याची मागणी करण्याचे निवेदन सहाय्यक अभियंते राघवेश एस. यांना दिले आहे.
याच बरोबर सद्या गावात कार्यरत असणारा वायरमन संतोष याची मनमानी सुरु असून शेतकरी वर्गाशी उद्धटपणे वागतो. लोकप्रतिनिधीच्या सुचनानाही वाटाण्याच्या अक्षता लावतो त्यामुळे त्याची येत्या आठवड्यात बदली करावी अन्यथा त्याला गावात येऊ देणार नाही असाही इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन देतेवेळी अध्यक्ष व विद्यमान सदस्य यल्लापा पाटील रमेश कांबळे, सदस्य प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर राकेश पाटील, विनायक कम्मार, शेतकरी संघटननेचे भाऊ पाटील, नारायण पाटील, मोहन पाटील, प्रल्हाद पाटील, निंगोजी पाटील, रमेश पाटील व अन्य शेतकरी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta