Wednesday , March 4 2026
Breaking News

रोटरी ई क्लबतर्फे गर्भवती मातांना सुका मेवा, फळांचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : रोटरी दिनदर्शिकेनुसार जुलै हा महिना माता व मुलांच्या आरोग्यासाठी समर्पित असल्यामुळे रोटरी ई क्लबच्यावतीने गर्भवती मातांना सुका मेवा व फळांचे वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

चौगुलेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व शहापूर येथील होसूर आरोग्य केंद्र येथे रोटरी ई क्लबच्या सदस्यांनी गर्भवती मातांना सुका मेवा व फळांचे वाटप केले. यावेळी प्राथमिक केंद्रावर जमलेल्या मातांसमोर डॉ. अनिता उमदी यांनी मातांचे आरोग्य व स्तनपान या विषयावर मार्गदर्शनपर विचार व्यक्त करून उपस्थित त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी रोटरी इ क्लबच्या अध्यक्षा रो. कविता कनगनी, सचिव रो. शिल्पा खडकभावी, रो. अलका चांडक, रो. डॉ. अनिल पाटील, रो. डॉ. प्रकाश फडणीस व क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *