Wednesday , March 4 2026
Breaking News

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक ३ रोजी

Spread the love

 

बेळगाव : येत्या ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नडसक्तीबद्दल होणाऱ्या मोर्चाबाबत विचार विनिमय करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक ३ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, युवा आघाडी व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *