Saturday , March 7 2026
Breaking News

विविध शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते त्यानुसार तुरमुरी, कल्लेहोळ, कोणेवाडी, बाची, बसरीकट्टी, अष्टे, चंदगड, खणगांव आणि मुचंडी मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून यावर्षी बेळगाव, खानापूर, निपाणी भागातील जवळपास तीनशे शाळांमधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सीमाभागातील मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढावी, शाळांचे आणि मराठी भाषेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात येतो.

तुरमुरी मराठी सरकारी उच्च प्राथमिक शाळा : शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी अश्वजीत चौधरी, निखिल देसाई, महेंद्र जाधव, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नागेश बेळगावकर, मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग आदी उपस्थित होते.

मराठी सरकारी उच्च प्राथमिक शाळा बाची : येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे श्रीशैल मासेकर, मासेकर सर, सागर जाधव, निखिल देसाई, मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग आदी उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे मुचंडी, अष्टे,चंदगड, खणगांव सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले आणि पदाधिकारी रोहन कुंडेकर, जोतिबा पाटील. मुख्याध्यापक व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

बसरीकट्टी : दरवर्षी प्रमाणे बसरीकट्टी मराठी सरकारी उच्च प्राथमिक शाळा शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते परशराम नागरोळी, कुमार शेरेकर, युवराज मुतगेकर, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष कृष्णा कोंडसकोप मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

Spread the love  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *