
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी शुभम शेळके यांना कन्नडसक्ती त्वरित मागे घ्यावी यासाठी आपण तातडीने पावले उचलावीत आशा आशायचे निवेदन सादर केले. एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या भेटीत कन्नडसक्ती करण्यात येत असल्याने मराठी भाषिकांच्या तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच आपण स्वतः मराठी भाषिक आहात त्यामुळे या कन्नडसक्तीचा मनस्ताप आपणास सुध्दा होणार त्यामुळे आपण हा कान्नडी सक्तीचा मुद्दा गांभीर्याने घावा अशी विनंती केली.
तसेच कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी आमदार हलगेकर यांना मागील निवेदनाची आठवण करून देताना खानापूर येथे नव्याने झालेल्या बसस्थानक, इस्पितळ व हेस्कॉम कार्यालयावर कन्नडभाषेसह मराठीत फलक बसले नसल्याची आठवण करून दिली, या निवेदनांतील कलमासह घालून दिलेल्या भाषिक अल्पसंख्याकांच्या बाबतीत असलेल्या कायदेशीर बाबी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कानावर राष्ट्रीय पक्षाचा नव्हे तर एक मराठी भाषिकांचा लोकप्रतिनिधी घालाव्यात व बहुभाषिक मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन आमदार हलगेकर यांना केले.
यावेळी विठ्ठल हलगेकर यांनी आश्वासन देताना मी स्वतः मराठी भाषिकांच्या मतांमुळे निवडून आलो आहे त्यामुळे कन्नडसक्ती थांबली पाहिजे याच मताचा मीही आहे आणि आपण मराठी वाचविण्यासाठी कार्य करत आहात याचा अभिमान ही आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून योग्य ती कारवाई तात्काळ करण्याचे विनंती करतो असे आश्वासन दिले.
सरचिटणीस मनोहर हुंदरे, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, पिराजी मुंचडीकर, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, रमेश माळवी, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले, जोतिबा येळ्ळूरकर, अशोक डोळेकर, प्रतिक गुरव, सचिन दळवी, अशोक घगवे, महेंद्र जाधव, विजय जाधव, सुरुज जाधव, राजू पाटील, प्रविण पाटील, उमेश पाटील, निलेश काकतकर, साईराज कुगजी, ज्ञानेश्वर चिकोर्डे, प्रशांत बैलूरकर, अभिषेक कारेकर, शुभम जाधव, रोशन पाटील, श्रीकांत नादूंरकर, शंकर पाखरे, शुभम पाटील, भरत पाटील, किरण पाटील, विनायक सुतार, प्रसाद पाटील, भरमाणी पाखरे, राजु पावले रामलिंग चोपडे, जोतिबा चोपडे, वैभव पाटील, प्रशांत पाटील, ओमकार पाखरे, संजय पाटील, विनायक पाटील, मल्लाप्पा मदार, शुभम जाधव, सागर कणबरकर, विनायक हुलजी, सुर्याजी पाटील, प्रतिक देसाई, राजू पाटील, बळीराम पाटील, साईराज कुगजी यांच्या सह मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta