Share

बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने गेल्या सात वर्षांपासून श्रावण मासानिमित्त संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात येत असून यंदाचे हे आठवे वर्ष आहे. यंदाची स्पर्धा रविवार दि. १७ ते मंगळवार १९ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत मराठा मंदिराचे सभागृह, खानापूर रोड, गोवावेस, रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ, बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटात होणार असून या दोन्ही गटातील विजेत्या भजनी मंडळांना समान रोख रकमेची प्रत्येकी दहा बक्षिसे त्याचबरोबर स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट मृदंग, तबला, पेटी वादक आणि गायक यांना रोख रकमेची बक्षिसे ही देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धा बेळगाव शहर तसेच बेळगाव, खानापूर व चंदगड तालुका या विभागांसाठी मर्यादित आहे.
सदर स्पर्धेत नाव नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. स्पर्धेचे माहिती पत्रक कार्यालयात उपलब्ध असून सदर विभागातील इच्छुक भजनी मंडळांनी अधिक माहितीसाठी संस्थेच्या गणपत गल्ली, बेळगाव येथील मुख्य कार्यालयात शनिवार सुट्टी खेरीज सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे वाचनालयाचे श्री. अनंत लाड व कार्यवाह सौ. सुनीता मोहिते यांनी कळविले आहे.

Post Views:
552
Belgaum Varta Belgaum Varta