
बेळगाव : महापौर मंगेश पवार, नगरसेवक जयंत जाधव यांच्या अपात्रता प्रकरणी 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती परंतु राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी ऍडव्होकेट जनरल उपस्थित राहणे बंधनकारक होते मात्र काही कारणास्तव ऍडव्होकेट जनरल अनुपस्थित राहिल्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली असून येत्या 13 ऑगस्टला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. महापौर व नगरसेवक अपात्रता प्रकरणी कोणता निर्णय होणार याकडे बेळगाववासियांचे लक्ष लागून राहिले आहे. याप्रकरणी 13 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी ऍडव्होकेट जनरल उपस्थित राहवे अशी सूचना न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे 13 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. नगरसेवक अपात्रता प्रकरणी तारीख पे तारीख पडत आहे व हा निकाल लांबणीवर पडत आहे परंतु या अपात्रता प्रकरणामुळे महानगरपालिकेची स्थायी समिती निवडणूक देखील रखडली आहे. या दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे बेळगाव महानगरपालिकेकडून नगर विकास खात्याकडे पाठवण्यात आली आहेत राज्य शासनाचे वकील युक्तिवाद करण्यासाठी अनुपस्थित राहत असल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडत आहे. आता 13 तारखेला निकाल लागणार का? याची प्रतीक्षा बेळगाव शहरातील नागरिकांना व नगरसेवकांना लागली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta