
बेळगाव : भारतात फर्निचर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेदरलाईट कंपनीची जागतिक दर्जाची उत्पादने आता बेळगावातही उपलब्ध होत आहेत. फेदरलाईटचे अधिकृत शोरूम खानापूर रोड येथील आकाश अंपायर येथे सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अश्विन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना कंपनीचे बिझनेस हेड ग्यानेद्र सिंग परिहार म्हणाले, फेदरलाईट गेली साठ वर्षे फर्निचर उत्पादन करत आहे.कंपनीच्या देशात 70 हून अधिक शाखा आहेत. कर्नाटकात बेळगावसह 7 ठिकाणी शोरूम आहेत. प्रत्येक इमारतीला फर्निचर अत्यावश्यक असते. याकडे लक्ष देऊन कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थांना उपयुक्त अशा प्रकारचे फर्निचर उत्पादन बनविण्यात फेदर लाईट अग्रेसर आहे. बंगळूरु आणि चेन्नई येथे असलेल्या कंपनीच्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या फॅक्टरीत कंपनीची फर्निचर बनविले जातात. संपूर्ण भारतीय बनावटीचे फर्निचर फेदरलाइट्स वतीने बनवण्यात येत असते. फर्निचर उत्पादनात देशात अग्रेसर असलेल्या फेदर लाइट्सने ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीचे आवश्यक असलेले, कार्यालयीन कामकाज तसेच शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी तसेच शैक्षणिक संस्थांना उपयुक्त अशी दर्जेदार फर्निचर उत्पादने निर्माण केली आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयआयटी, आयआयएम तसेच अनेक नामवंत मेडिकल कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमधून फेदरलाईटची फर्निचर वापरण्यात येत आहेत.
कंपनीने नेहमीच चांगल्या दर्जाच्या फर्निचर उत्पादनांवर भर दिलेला आहे. शरीराला आरामदायी फर्निचर उत्पादने बनविण्यात कंपनीचे विशेष प्राविण्य आहे. त्याचबरोबर फर्निचर उत्पादने निर्माण करताना सौर ऊर्जा, झिरो वेस्टेज, पर्यावरण पूरक आणि रिसायकल करता येणारी उत्पादनांवर भर दिला आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून फेदर लाइट्सने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये ही प्रामुख्याने कंपनी वतीने खुर्च्या बनविण्याच्या कामात 30 टक्के महिला कार्यरत आहेत. त्याचबरोबर अंधांनाही योग्य त्या प्रकारचे काम देण्यात आलेले आहे.
बेळगाव ही कंपनीने आपल्या उत्पादन विक्री कार्याला सुरुवात केली आहे. बेळगाव आणि परिसरातील नामवंत शैक्षणिक संस्थांनी फेदरलाईटच्या उत्पादनांबाबत उत्सुकता दाखवली आहे. याचबरोबर सरकारी कार्यालयीन फर्निचरसाठी कंपनीने एक विशेष टीम बनविली आहे. या टीमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सरकारी कार्यालयातील फर्निचर उत्पादनाबाबत माहिती देण्यात येणार आहे असेही परिहार यांनी सांगितले यावेळी कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर संतोष मुथा, रंजन चव्हाण आदी ही उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta