
बेळगाव : निट्टूर ग्रामपंचायत हद्दीतील दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात बेळगाव युवा कर्नाटक भिमसेना आणि युवाशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. आज बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी बेळगाव शहरातील चन्नम्मा चौकात युवा कर्नाटक भिमसेना तसेच युवाशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निट्टूर ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अर्धनग्न आंदोलन केले. 2007 मध्ये निट्टूर ग्रामपंचायत हद्दीत दलित संघर्ष समितीचे समुदाय भवन उभारणीसाठी सरकारी जमीन मंजूर झाली होती परंतु अद्याप शासनाने हे भवन बांधले नाही. गावोगावी दलित समाजाला समुदाय भवन मंजूर केले पाहिजे असे सरकारने केवळ आश्वासने देऊन दलित समाजाला फसू नये. दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले पाहिजे. त्याचप्रमाणे अनाधिकृत शौचालय देखील हटवावीत. यासह विविध मागण्या करत दलित संघटनांनी आज अर्धनग्न आंदोलन केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण मादर यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta