
बेळगाव : बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उत्तर विभागाच्या उपनिबंधक कार्यालयावर लोकायुक्तांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारींचा सुरू होता. या तक्रारीच्या आधारावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला आहे. लोकायुक्त अधिवक्ता शुभविर जैन यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली असून, वरिष्ठ उपनिबंधक करिबसवनागौडा पी. यांच्यासह कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लोकायुक्त अधिकारी सध्या प्रत्येक कागदपत्राची आणि नोंदीची तपासणी करत आहेत.
या कारवाईत लोकायुक्त सीपीआय आदिवेप्पा बूदिगेप्पा यांच्यासह दहाहून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या छाप्याने सरकारी कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta