
बेळगाव : धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती समितीने जाहीर केलेल्या महामोर्चाला जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला.
काल रात्री 9 वाजता कलमेश्वर मंदिर धामणे येथे कन्नडसक्ती विरोधातील मोर्चासंदर्भात जनजागृतीसाठी बैठक झाली. या बैठकीमध्ये दिनांक 11- 8- 2025 रोजी श्री धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतेवेळी यल्लपा रेमानाचे, बाळू केरवाडकर, विजय बाळेकुंद्री, मनोहर जायानाचे, यांनी विचार मांडले. आपण धामणे येथून मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील होऊ, असा निर्धार व्यक्त केला
बैठकीला उपस्थित दशरथ येळ्ळूरकर, हणमंत बाळेकुंद्री, वामन पाटील, महादेव येळवी, पुंडलिक रेमानाचे, शिवाजी पाटील, मोहन पाटील, सतीश जायानाचे, अमित कामानाचे, आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
धामणे विभाग येथील मराठी भाषिक कार्यकर्ते व आजी- माजी लोकप्रतिनिधी या सर्वांनी सोमवारी सकाळी ठीक 10 वाजता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक येते उपस्थित रहावे अशी विनंती धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta