बेळगाव : बेळवट्टी गावाचा वीज पुरवठा दररोज खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे येथील गावातील अनेक कामे करण्यास व्यत्यय येत आहे, त्यामुळे या समस्येला कंटाळून आज बेळवट्टी गावच्या ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी गांधीनगर येथील हेस्कॉम कार्यालयाला भेट देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा याबाबत निवेदन दिले.
बेळवट्टी गावांमध्ये वीज पुरवठा सातत्याने खंडित करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचण येत आहे. तसेच परीक्षा देखील जवळ आल्याने अभ्यास कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना समोर आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच गावातील अनेकांची कामे व्यवस्थितरित्या पूर्ण व्हावे याकरिता बेळवट्टी गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …