Monday , September 21 2026
Breaking News

अनिल परब निकटवर्तीयाच्या 26 मालमत्तेवर छापे आयकर छापे

Spread the love


मुंबई : प्राप्तिकर विभागाने राज्यातील २६ ठिकाणांवर शोध मोहिम राबवली होती. ८ मार्च रोजी मुंबईतील केबल ऑपरेटर्स, राज्य सरकारी कर्मचारी आणि व्यावसायिकांशी संबंधितांच्या ठिकाणांवर छापे टाकले गेले. यामध्ये मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या मालमत्तेवर छापा टाकला गेला. एकूण २६ ठिकाणी केलेल्या या शोधमोहिमेत जवळपास ६६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. २६ ठिकाणांमध्ये मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीचा समावेश आहे. यामध्ये दापोलित एका बड्या राजकीय व्यक्तीने २०१७ मध्ये जमिन खरेदी केली होती ज्याची किंमत अंदाजे १ कोटी इतकी आहे. मात्र त्याचे रजिस्ट्रेशन २०१९ मध्ये करण्यात आले.
पुणे, सांगली, बारामतीसह अनेक ठिकाणी संबंधितांनी मोक्याच्या जागी गेल्या दहा वर्षात मालमत्ता जमवली आहे. कुटुंबाच्या मालकीचा एक बंगला आणि फार्महाऊस पुण्यात आले. तर आलिशान असं फार्महाऊस तासगावमध्ये आहे. सांगलीत दोन बंगले, दोन व्यावसायिक कॉम्प्लेक्सचासुद्धा समावेश आहे. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच फ्लॅट आहेत. तर एक फ्लॅट नवी मुंबईत आहे. तसंच सांगली, बारामती, पुण्यात रिकामे प्लॉट आहेत. तसंच १०० एकरहून अधिक शेतजमीन गेल्या ७ वर्षात संबंधित व्यक्तीने खरेदी केल्याची माहिती प्राप्तीकर विभागाने दिलीय.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *