
बेळगाव : कर्नाटक राज्यातील शेडबाळ येथेही आज नांदणी मठातील माधुरी हत्ती परत मठात घेऊन यावा या मागणीसाठी गाव बंद करून आंदोलन करण्यात आले. वनतारामधून माधुरी हत्तीला नांदणी मठात परत घेऊन यावे या मागणीसाठी शेडबाळ गावातील संपूर्ण व्यवहार बंद करून भव्य मोर्चा काढण्यात आला.

शांतीसागर जैन आश्रमापासून श्री बसवाण्णा मंदिरापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी माधुरी हत्तीला वनतारामधून नांदणी मठात परत आणावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले व घोषणा दिल्या गेल्या. शांतीसागर जैन आश्रमाचे अध्यक्ष राजू नांद्रे यावेळी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र सरकार माधुरी हत्तीला नांदणी मठात परत घेऊन येईल यावर आमचा विश्वास आहे. नांदणीला माधुरी हत्तीचे लवकरात लवकर आगमन व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चामध्ये जैन समाजासह इतर समाजबांधव, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग, शालेय विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta