बेळगाव : रक्षाबंधन म्हणजे एक पवित्र सण, तो फक्त एकाच आईच्या उदरातुन जन्म घेतलेल्या बहीण भावाचा सण नसून समाजात वावरत असताना भेटलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने साजरा करायचा सण असल्याचे मत अंध विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या समृद्ध फौंडेशनचे सचिव प्रशांत पोतदार यांनी व्यक्त केले.
संजीवीनी फौंडेशन आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मदन बामणे आणि सल्लागार सदस्या डॉ. नविना शेट्टीगार उपस्थित होत्या.
प्रारंभी राधिका तंदूर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
त्यानंतर नविना शेट्टीगार यांनी प्रास्ताविक करताना संस्थेबद्दल माहिती सांगून रक्षाबंधनाचे महत्व सांगितले.
मदन बामणे यांच्या हस्ते पोतदार यांचा शाल स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित समृद्ध फौंडेशनच्या अंध विद्यार्थ्यांना तसेच काळजी केंद्रातील रुग्णांना राख्या बांधून त्यांचे औक्षण करण्यात आले.
शेवटी अंध विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनावर आधारित सुमधुर गाणी सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी नेगी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना शिरहट्टी, सुनील चन्नदासर, पद्मा औषेकर, सरिता सिद्दी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Belgaum Varta Belgaum Varta