बेळगाव : कार झाडावर आदळल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाले आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सदर अपघात बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बेळगाव-बागलकोट मुख्य रस्त्यावरील सोमनट्टी गावाजवळ घडला. यरगट्टीहून बेळगावकडे जात असताना सोमनट्टी गावाजवळ स्विफ्ट डिझायर कारचे नियंत्रण सुटले आणि कार थेट झाडावर आदळली.
बेळगाव तालुक्यातील करिकट्टी गावातील सचिन यल्लप्पा बोरीमरद (२१) आणि बालकृष्ण बसप्पा सुळधाळ (१९) अशा मृत युवकांची नाव आहेत. लक्कप्पा यल्लप्पा बोरीमरद (२३) हा तरुण जखमी झाला असून त्याला बेळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
डीवायएसपी डॉ. वीरैया हिरेमठ, पीआय गजानन नायक, पीएसआय इरप्पा रिठी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नेसरगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta