Sunday , July 26 2026
Breaking News

थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय

Spread the love

 

बेळगाव : कन्नडसक्ती विरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. पण मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे सकाळी ठीक 11 वाजता थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमा होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तातडीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आला.

उद्या सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मराठी भाषिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमून मराठीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते. पोलिस प्रशासनाने मोर्चास असली तरी निवेदन सादर करण्यास अनुमती असल्याचे पत्र मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले असून त्या अनुषंगाने कायद्याच्या चौकटीत राहून मोर्चा ऐवजी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्व कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौक ऐवजी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून कन्नड सक्ती विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीला मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *