Wednesday , March 4 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक उत्साहात संपन्न

Spread the love

 

विविध स्पर्धां व परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या सुरूवातीला उपस्थितांचे स्वागत इंद्रजित मोरे यांनी केले. या बैठकीमध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षी गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.. यानिमित्ताने वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. यावर्षी विद्यार्थ्यांसाठी साठे प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन यांच्या वतीने विज्ञान कथाकथन स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार आहे.. त्याचबरोबर मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व कवी द. रा. किल्लेकर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील रितसर माहिती व परिपत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. या बैठकीमध्ये नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या रौप्यमहोत्सवी बालसाहित्य संमेलनाबाबत ही चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर, सुरेश गडकरी, प्रा. सुरेश पाटील, विजय बोंगाळे, बी.बी. शिंदे, नारायण उडकेकर, नीला आपटे, गजानन सावंत, प्रसाद सावंत, शिवराज चव्हाण, हर्षदा सुंठणकर, स्नेहल पोटे उपस्थित होते. आभार धिरजसिंह राजपूत यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *