बेळगाव : मुतगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीत मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज देत नसल्याच्या निषेधार्थ तसेच सोसायटीतील गैरव्यवहाराबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी देखील याच मुद्द्यावरून सचिन पाटील यांनी उपोषण केले होते मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर कृषी पत्तीन सोसायटीच्या संचालकांनी आश्वासन दिले होते. परंतु संचालक मंडळाने आपले आश्वासन न पाळल्याने सचिन पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले.
दरम्यान, आज मुतगा गावचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील व गजानन कणबरकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांना भेटले व सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कुलगोड, संचालक राजू अंकलगी, माजी आमदार अरविंद पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, जिल्हा बँकेचे सीईओ व अधिकारी अरुण पाटील यांच्या सोबत सोसायटीत सुरू असलेल्या अडचणीवर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली व या अडचणीवर सुवर्णमध्य काढून लवकरात लवकर शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज पुरवठा करण्याचे आश्वासन जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दिले.

Belgaum Varta Belgaum Varta