Thursday , June 4 2026
Breaking News

आर्मी पब्लिक स्कूलची द. विभागीय ज्युडो स्पर्धेत चमकदार कामगिरी

Spread the love

 

बेळगाव : आर्मी पब्लिक स्कूल, एमएलआयआरसी बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी शिर्डी, महाराष्ट्र येथे नुकत्याच पार पडलेल्या सीबीएसई दुसऱ्या दक्षिण विभागीय ज्युडो चॅम्पियनशिप -2025 स्पर्धेमध्ये 12 पदके जिंकत चमकदार कामगिरी नोंदवली असून या शाळेच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शिर्डी, महाराष्ट्र येथे गेल्या दि. 4 ते दि. 6 ऑगस्ट दरम्यान सीबीएसई दुसऱ्या दक्षिण विभागीय ज्युडो परदेशी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल, एमएलआयआरसी बेळगावच्या आर्या मुचंडी, समर्थ माने, अनुष्का भोसले, तृप्ती बस्तवाडकर, अभिमन्यू गुरव व श्रेया वासुलकर यांनी रौप्य पदक, त्याचप्रमाणे पृथ्वीराज महाडिक, सावनकुमार हडपड, अभय लकुंडी, आयुष पवार, कार्तिक श्रीरंगशेट्टी व झिक्रा बिष्टी यांनी कांस्य पदक पटकावले. यापैकी सहा ज्युडो खेळाडू राजस्थान येथील श्रीगंगानगर येथे आयोजित सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. उपरोक्त यशस्वी ज्युडो खेळाडूंना प्रशिक्षक रेखा अक्षय जांगळे यांच्या समर्पित मार्गदर्शन आणि प्रशिक्षण असून या सर्वांचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी खास अभिनंदन करून जिद्द, कौशल्य आणि खिलाडूवृत्तीचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खडेबाजार पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड; एक आरोपी अटकेत

Spread the love  बेळगाव : खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका जुगार विरोधात कारवाई करत एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *