
बेळगाव : रेल्वे खात्याकडून डब्लिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे लेव्हल क्रॉसिंग गेट नं. 383 अर्थात टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट शनिवार दि. 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रविवार दि. 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
तरी नागरिक आणि वाहनचालकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे आणि उपरोक्त कालावधीत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन रेल्वे खात्यातर्फे करण्यात आले आहे.
रेल्वे खात्याच्या वतीने बेळगावची रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे कधी पहिला रेल्वे गेट तर कधी दुसरा तर कधी तिसरा गेट तर तानाजी गल्ली चा गेट रहदारीसाठी बंद केला जात आहे. त्यामुळे त्याचा ताण बेळगाव शहरातील ट्राफिक वर पडत आहे. आता पहिला रेल्वे फाटक एक दिवसासाठी बंद असणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta