Sunday , September 8 2024
Breaking News

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Spread the love

बेळगाव : विद्यार्थ्यांनी मेहनत जिद्द चिकाटी ठेवली, तर ध्येय गाठणे सहज शक्य आहे. नापास झालो, म्हणून खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न केल्यास, यश निश्चित मिळते, असे उद्गार क्रिष्ण डायगोस्टिक पुणेचे उपाध्यक्ष श्री. अनिल जी. साळुंखे यांनी काढले. त्यांनी पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी अनेक पाहुणे संस्थेचे संचालक उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे सचिव श्री. प्रकाश नंदिहळी यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राचार्या एम. एच. पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तद्नंतर सर्व उपस्थित पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रमुख पाहुणे नगरसेवक, बिल्डर श्री. अभिजीत जवळकर, नगरसेवक श्री. मंगेश पवार, उद्योजक श्री. संजय एन् पाटील, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर साडी कारखानदार श्री. जीवानंद पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नेताजी कटांबळे, उपसचिव श्री. एस. के. चिट्टी विद्यार्थी प्रतिनिधी श्वेता चौगुले, किशोर बिजगरकर, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख श्री. उदय पाटील व सौ. धनश्री पाटील उपस्थित होते.
सन 2021-22 सालातील यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. वार्षिक अहवाल वाचन प्रा. वाय. टी. मुचंडी यांनी केले. शेवटी प्रा. एस. एन. नंदनवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गीता कुलकर्णी यांनी केले. तद्नंतर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. के. एल. शिंदे, प्रा. आर. व्ही. हळब, प्रा. एम. एच. नागेनहट्टी प्रा. जी. जी. होसूर, प्रा. आर. एन. चलवेटकर, प्रा. विजया डिचोळकर, प्रा. धनश्री गाडे, सुरज हत्तळगे, कूसमावती अष्टेकर, प्रा. एल. एस. बांडगे, अमोल देसाई  व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *