रविवारी सर्वसाधारण सभा
बेळगाव : तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला 2024- 25 च्या आर्थिक वर्षात 45 लाख, 31 हजार, 576 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यावेळी सभासदांना 11 टक्के लाभांश देण्यात येणार, बँकेची 74 वी सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 17 रोजी होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
बँकेच्या कार्या संदर्भात अधिक माहिती देताना मरगाळे पुढे म्हणाले, वर्ष अखेरीस बँकेची सभासद संख्या 8817 इतकी आहे. तसेच बँकेचे भाग भांडवल 1,46,99,400 रुपये इतके आहे. बँकेकडे 9,67,74,315 रुपये इतका राखीव व इतर निधी आहे. बँकेकडे 54,90,36741 रुपयांच्या ठेवी आहेत.बँकेकडे 69,87,67,803 रुपयांचे खेळते भांडवल आहे. बँकेच्या शेअर्स, डिपॉझिट, गुंतवणूक आणि खेळत्या भांडवलात वाढ झालेली आहे. त्यामुळेच सभासदांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून बँकेने 37,76,40,103 इतक्या रुपयांचे विविध रुपात कर्ज वितरण केले आहे. बँकेच्या कर्ज वसुलीचे प्रमाणही समाधानकारक आहे. बँकेला ब ऑडिट श्रेणी मिळालेली आहे.
बँकेच्या वतीने सभासदांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना अखंडितपणे सुरू आहेत. रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे बँकेच्या कार्यावर अनेक प्रकारच्या मर्यादा आल्या असल्या तरीही सभासदांच्या सहकार्यातून बँकेने प्रगतीची वाटचाल चालविली आहे.बँकेने कोअर बँकिंग सुविधा सुरू केली आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष नारायण पाटील यांच्यासह तज्ञ संचालक विजय पाटील, संचालक प्रदीप ओऊळकर, संचालक राजू मर्वे, मोहन कंग्राळकर, प्रवीण जाधव, संजय बाळेकुंद्री, सुनील आनंदाचे, संदीप मुतकेकर, बँकेचे व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta