स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्हा आघाडीवर होता : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक लढाईतून भारतीयांना मिळालेल्या स्वातंत्र्याने जगाच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. त्याने जगात लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया रचला आहे. स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्ह्याची भूमिका कमी नाही. देशाला अतुलनीय सेनानी, खरे देशभक्त आणि स्वाभिमानी सैनिकांचे योगदान देणारा आपला जिल्हा स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर होता, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.
शुक्रवारी शहरातील जिल्हा स्टेडियममध्ये ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वज फडकवताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने अनेक लोकहिताचे कार्यक्रम आखले आहेत. सामाजिक न्याय आणि समानतेच्या मार्गावर एक ठोस पाऊल टाकले आहे. ते म्हणाले की, शक्ती, अन्नभाग्य, गृहज्योती, गृहलक्ष्मी आणि युवानिधी या पाच हमी योजना लोकांना दिलेल्या वचनानुसार यशस्वीरित्या राबविल्या जात आहेत आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली आहेत. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक संघर्षातून भारतीयांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याने जगाच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. त्यामुळे जगात लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया रचला गेला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिक महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, बाळ गंगाधर टिळक आणि इतर अनेक महान व्यक्तींचे स्मरण करणे हे आपल्या सर्वांचे प्राथमिक कर्तव्य आहे. कित्तूर राणी चनम्मा, संगोळी रायन्ना यांनी इंग्रजांना पळवून लावण्यात मोठे योगदान दिले आहे.
स्वातंत्र्य संग्रामात आघाडीवर असलेले आणखी एक महान पुरुष म्हणजे कै. गंगाधर देशपांडे. ‘कर्नाटकचे सिंह’ आणि ‘कर्नाटकचे खादी भगीरथ’ म्हणून ओळखले जाणारे देशपांडे यांनी मोठे योगदान दिले. आज आपण त्यांच्यासोबत स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या अनेकांना आठवले पाहिजे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सरकारने अनेक लोकहिताचे कार्यक्रम आखले आहेत. त्यांनी सांगितले की त्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेच्या मार्गावर एक ठोस पाऊल टाकले आहे.
दरम्यान, शहरातील जिल्हा स्टेडियममध्ये आयोजित ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात, जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि पोलिस आणि अग्निशमन दलासह विविध पथकांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ उचगाव

बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ उचगाव या सोसायटीच्या वतीने 79 वा ध्वजारोहण कार्यक्रम सोसायटीचे संस्थापक- चेअरमन श्री जवाहरलाल शं. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ध्वजारोहण संचालक श्री. किशोर पावशे यांच्या अमृत हस्ते करण्यात आले फोटो पूजन श्री. बाळकृष्ण देसाई व श्री. बाळू पावशे यांनी केले दीपप्रज्वलन कविता जाधव, प्रताप देसाई, चंद्रकांत देसाई, पवन देसाई, शंकर पाटील यांनी केले. कार्यक्रम सोसायटीचे सदस्य सभासद ठेवीदार हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते मोठ्या संख्येने व उत्साहाने संपन्न झाला.
बॅ नाथ पै चौक शहापूर

येळ्ळूर वेस चर्मकार समाज सुधारणा युवक मंडळ यांच्या वतीने 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष श्री. गणेश काळे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते श्री. दयानंद मारुतीराव चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर पवार यांनी केले. श्री. सदानंद कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला समाज बांधव भगीनी, विद्यार्थी, महिला मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मराठी विद्यानिकेतनमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कन्नड विषय शिक्षक विशाल पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे विशाल पाटील यांना स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीत, देशभक्तीपर गीत संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी सादर केले. नववीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलनाने पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील, कोच श्रीधर बेन्नाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तन्वी प्रसाद कोकितकर, श्रीशा महेश पाटील, श्लोक सुजय पाटील, हर्ष सूरज मासेकर, शार्दुल अंकुश केसरकर, सिद्धी सोपान मोरे, शर्वी पवन बेळगुंदकर, श्रावणी पाटील या बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. प्राथमिक विभागातून आरूष प्रसाद सावंत याने इंग्रजी भाषेत, श्रेया सावंत मराठी भाषेत, आराध्या जाधव कन्नड भाषेत, हर्ष पाटील याने इंग्रजी भाषेत आपली मनोगते व्यक्त केली. अक्षता होन्नापगोळ यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले तर शिवराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने एक नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. प्रमुख पाहुणे विशाल पाटील यांनी आजच्या सद्य परिस्थितीतील भारताचे वर्णन केले. भ्रष्टाचार, स्त्रीवरील अन्याय, शिक्षण, वैज्ञानिक प्रगती या सर्व विषयांवर त्यांनी प्रकाश पाडला. शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, गौरी चौगुले, शिक्षण समन्वयक सविता पवार, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमल हलगेकर यांनी केले.
सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे मोठ्या उत्साहात साजरा

79 वा स्वातंत्र्यदिन शाळेच्या समोर करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. यानंतर माजी सैनिक श्री. शिवाजी जोतिबा नांदुरकर यांच्या हस्ते महात्मा गांधीजी च्या प्रतीमेचे पुजन तसेच माजी सैनिक श्री. शंकर टक्केकर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर ध्वजस्तंभ पुजन एस.डी.एम.सी. सदस्य श्री.मारुती कृष्णा यळगुकर यांच्या हस्ते करण्यात आले नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेन्द्र चलवादी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे एस्.डी.एम्.सी. उपाध्यक्ष श्री.जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मानवंदना करुन गावांमध्ये प्रभात फेरी काढून शाळेमध्ये मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर शाळेमध्ये मुलांची देशभक्तीपर भाषणे व ग्रुप डान्स घेण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी श्री महेश होनुले यांनी जुन्या व आताच्या नवीन शाळेच्या इमारतीचे छायाचित्रे काढून फेम करून शाळेला भेट दिले. यावेळी शाळेचे एस्.डी.एम.सी. सदस्य श्री. मुर्तीकुमार माने, श्री.चांगदेव मुरकुटे, श्री. दिनेश लोहार, श्री.शशिकांत पाटील, श्री.जोतिबा पाटील, श्री. विजय धामणेकर, सौ. दिव्या कुंडेकर, सौ.अलका कुंडेकर, सौ.प्रियंका सांबरेकर, सौ.माधुरी कुगजी, सौ.रेश्मा काकतकर, सौ.राजश्री सुतार, श्रीमती शुभांगी मुतगेकर व शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका श्रीमती एम्.एस्.मंडोळकर यांनी केले आभार श्री. सातेरी पाखरे मानले.
मनगुत्ती लाल बहादूर शास्त्री विद्यालय

मनगुत्ती : मनगुत्ती येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालयात 79 वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला मुख्याध्यापक डी. के.स्वामी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा पंचायत सदस्य रमेश पाटील यांनी व तालुका पंचायत सदस्य सुरेश बेन्नी यांनी ध्वज स्तंभाचे श्रीफळ वाढवून पूजन केले. तर वैजनाथ कोतेकर व सयाजी यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंझारराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी यशस्वी आणि गुणी विद्यार्थ्यांना रोख रकमेची बक्षिसे देऊन झुंझारराव पाटील व वैजनाथ कोतेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षक शिवाजी हसनेकर यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.
यावेळी सुबराव पाटील, आर. बी. कामनगोळ, राजू पाटील, गीता बेडका, कोमल पाटील, रंजना शामणे बाळू मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एस. के. मेंडुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर के. एम. राऊत यांनी आभार मानले.
सर्वदा सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आज गोंधळी गल्ली येथील सर्वदा मल्टिपर्पज को.ऑप. सोसायटीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या फोटोचे पूजन संचालक श्री.आनंत पावशे यांच्या हस्ते तर ध्वजारोहन संस्थेचे संचालक श्री.बाबू पावशे यांच्या हस्ते करण्यात आले, राष्ट्रगीताने तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन पुरोहित, उपाध्यक्ष धनंजय पाटील, संचालक रमेश पाटील, श्रीनाथ बेळवडी, संजय पाटील, चंद्रकांत मेलगे, संतोष अर्कसाली, संचालिका रूपा साखरे, शीतल शंभुचे, सेक्रेटरी मोहन कोचेरी, शाखा व्यवस्थापक राजू मुतकेकर, रूपाली खांडेकर, संगीता कुंडेकर, भरमा बेळगावकर, यल्लप्पा वळतकर, सुनील पाटील, योगेश गौडाडकर व इतर उपस्थित होते.
श्री महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी

श्री महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी 15 ऑगस्ट साजरा करण्यात आला. त्यावेळी तोपिनकट्टी परीसरातील देशाचे आजी-माजी सैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक ट्रस्टी सुरेश देसाई होते. त्यावेळी सर्व सैनिकांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. विशेष सिंदूर लढाईमध्ये भाग घेतलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी सैनिक श्री नामदेव जो गुरव विद्यार्थ्यांना यांनी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. ज्येष्ठजेस्ट माजी सैनीक रामचंद्र हलगेकर होते. त्यावेळी सुरेश देसाई यांनी कोणत्याही भाषेचा विरोध न करता आपली मराठी भाषा संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी एकत्रितपणे संघटीत रहावे यासाठी मार्गदर्शन केले त्यावेळी संस्थेचे संचालक शिवाजी गुरव. व्हा. चेअरमन ईराप्पा पाटील, काळेशी बाचोळकर, महादेव गुरव, बसवंत होसुरकर, भरतारी कुंभार, नारायण पाटील, हेड मास्तर आरगुचे, गोरे, नागेंद्र पाटील, होसूरकर एल डी, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta