बेळगाव : कॉलिटी ऍनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बॅग पहिलीच्या मुलांना शर्ट पॅन्ट वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली त्यानंतर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. भुजंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कॉलिटी कंपनीने आपल्या व्यवसायाबरोबरच शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठे योगदान दिलेले आहे. याप्रसंगी क्वालिटीचे एमडी अजित लोकूर, चेअरमन डॉ. मधुकर पवार, मोहन सिद्धी, इम्रान अत्तार, कार्तिक कुसबी यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतचे अध्यक्ष लक्ष्मी पाटील, उपाध्यक्ष कासवा कांबळे, शाळेचे अध्यक्ष शांताराम कुपटगिरी सदस्य मारुती लकेबैलकर, ग्रामपंचायत सदस्य संकेत पाटील, सतीश चव्हाण, पंकज घाडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण निलजकर यांनी केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना बॅग व पहिलीच्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट पॅन्ट वितरण करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta