Wednesday , March 4 2026
Breaking News

कावळेवाडी क्रॉस जवळील अपघातातील जखमी मामाचाही मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बिजगर्णी-बेळवट्टी रस्त्यावरील कावळेवाडी क्रॉसजवळ रविवारी (दि. 17) सायंकाळी झालेल्या कार-दुचाकी अपघातात बेळवट्टी येथील रोहिणी रामलिंग चौगुले या तरुणीचा मृत्यू झाला होता. तर तिची आई व मामा गंभीर जखमी झाले. त्यामधील मामाचा सोमवारी (दि. 18) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सतीश विष्णू मोहिते (वय 35, रा. तुडये, ता. चंदगड) असे मृत मामाचे नाव आहे. युवतीची आई लक्ष्मी रामलिंग चौगुले (वय 40 रा. बेळवट्टी, ता. बेळगाव) जखमी झाली असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, जखमी लक्ष्मी यांचे माहेर तुडये आहे. भाऊ सतीश यांच्या शेतात भात लावणी करण्यासाठी मायलेकी गेल्या होत्या. दोन दिवस भात लावून झाल्यानंतर मामा सतीश हे आपल्या दुचाकीवरुन बहीण लक्ष्मी आणि भाची रोहिणी यांना बेळवट्टीला सोडण्यास जात होते. बिजगर्णी-बेळवट्टी वसंत अष्टेकर यांच्या शेताजवळ मोठा खड्डा पडला आहे.

बिजगर्णी-बेळवट्टी दरम्यान समोरुन येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रोहिणीचा जागीच मृत्यू झाला. तर सतीश आणि लक्ष्मी यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली होती. दुचाकीचालक सतीश आणि मागे बसलेली भाची रोहिणी उडून तब्बल 50 फुटांवर शेतात फेकले गेले. दोघांच्याही शरीराचा चेंदामेंदा झाला होता. रोहिणीचा जागीच मृत्यू झाला तर सतीशगंभीर जखमी होऊन तेथेच पडले होते. तर लक्ष्मी गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळल्या होत्या. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी तातडीने रुग्णवाहिकेतून या सर्वांना जिल्हा रुग्णालयाकडे हलविले. मात्र, रोहिणीचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सतीश आणि लक्ष्मी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून होते. मात्र, सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सतीश यांचा मृत्यू झाला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *