बेळगाव: अवघ्या सात दिवसांवर गणेश उत्सव असल्याने मूर्तीकरांची लगबग वाढली आहे. यंदा बेळगाव शहरात पीओपी की शाडू हा विषय चर्चेत होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेने मूर्तिकार व विक्रेत्यांना नोटीस बजावण्याची व्यवस्था देखील केली होती. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा बेळगाव शहरात कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन होते हा मुद्दा समोर ठेवून पीओपी मूर्ती वरती कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे परराज्यातून मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे शाडू मूर्ती तयार करण्यात मूर्तिकारांना अडचणी आल्या प्रशासनाने देखील पीओपी बंदी केली नसली तरी, गणेश भक्तांची मानसिकता या बदलली असून शाडू मूर्तीला मागणी वाढली आहे.
मात्र यंदा देखील शहरात
घरगुती गणेश मूर्ती एक ते दोन फुट, तीन फुटापर्यंत पुजवण्याचा पायंडा गणेश भक्तानी घातला आहे. गणेशोत्सव अवघ्या सात दिवसावर येऊन ठेपला असून गणेश भक्त घरगुती गणेशमूर्ती बुकिंगला प्रारंभ सुरू केला आहे. मोठी कुटुंबे मोठ्या श्रीमूर्ती पुजण्यावर भर देत आहेत. प्रशासनाने जरी पीओपी वरती बंदी आणली असली तरी गणेश भक्तांची मानसिकता बदलली असून शाडू मूर्तींना मागणी वाढली आहे. यंदा शाडू मूर्ती बाजारात मिळत नसल्याने न रंगवता मूर्ती बनवून देण्याचा घाट गणेश भक्त मूर्तिकारांना घालत आहेत. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती घरच्या घरी विसर्जन करता येईल यावर भर दिला जात आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांच्या हाताला काम मिळाले आहे. यंदा परराज्यातून मोठ्या प्रमाणात श्रीमूर्ती बेळगावला विक्रीसाठी आले आहेत. मूर्तीला वस्त्र नेसवण्याबरोबर फेटे बांधण्याची क्रिया देखील वाढीस लागले आहे. कुंदन वर्क करण्यात महिलावर्ग आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे शाडूच्या गणेश मूर्ती कमी तयार झाल्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta