
बेळगाव : गणपती विसर्जन मार्ग आणि इतर भागांतील समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते कपिलेश्वर तलावपर्यंत पोलिस आयुक्त भूषण बोरसे, बेळगाव महानगरपालिका आयुक्त शुभा बी. पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जनसंपर्क सदस्य विकास कलघटगी, मनपाचे अधिकारी आणि हेस्कॉमचे अधिकारी यांनी पाहणी केली. शुक्रवारी सकाळी राणी चन्नमा सर्कल येथून पाहणी फेरीला प्रारंभ झाला. सरदार हायस्कूल रोड, शनिवार खुट गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खुट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, हेमू कलानी चौक, शनी मंदिर रेल्वे ब्रिज आणि कपिलेश्वर मंदिर येथील गणपती विसर्जन तलाव इथपर्यंत पहाणी दौरा पार पडला.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मनपा आयुक्त बी. शुभा यांना वरील मार्गावरून जाताना काही ठिकाणी त्यांना त्यांनी सूचना केली. गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी पाहणी करण्यात आली. याप्रसंगी रहदारी शाखेचे एसीपी ज्योतिबा निकम खडे बाजार पोलीस स्टेशनचे नंदेश्वर, दक्षिण वाहतूक पोलीस निरीक्षक बसनगौडा पाटील, हेस्कॉम सेक्शन अधिकारी गलगली, अन्न खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta